India

‘त्या’ खात्यांवर ट्विटरने केली कारवाई

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

पाकिस्तानी आणि खलिस्तानी समर्थकांशी संबंधीत असलेली खाती ट्विटरने कारवाई करून बंद करावीत. त्याचप्रमाणे सुचनेनुसार ट्विटरने कारवाई केली नाही तर ट्विटरला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा सरकारने ट्विटरला दिला होता. यानंतर ट्विटरने या खात्यांवर कारवाई केली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशांनुसार 500 पेक्षा जास्त खात्यांवर कारवाई केली आहे. खाते बंद करून चुकीच्या पद्धतीने ट्रेंडिंग होणारा हॅशटॅग देखील काढण्यात आला आहे.

ट्विटर खात्यांवरून भारतातील शेतकरी आंदोलनाविषयी बदनामाची मोहीम राबवली जात आहे. त्यातून भारताच्या सार्वजनिक शांततेला धोका पोहचत आहे, असे केंद्र सरकारने म्हंटले होते. यानंतर ट्विटरने संबंधित खात्यांवर कारवाई केली असून 26 जानेवारीच्या घटनांचा उल्लेख करत ट्विटरने म्हटलंयनिष्पक्ष पद्धतीने भारत सरकारच्या निर्देशानुसार केवळ भारतातच काही अकाउंट बंद करण्यात आली आहेत. तर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि माध्यमांचे ट्विटर हॅण्डल ब्लॉक केलेले नाही. कारण असे केल्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होईल. तसेच, ते आपल्या वापरकर्त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करणे सुरूच ठेवेल आणि त्यासाठी भारतीय कायद्यांच्या पर्यायांवर विचार करत आहे, असेही ट्विटरने सांगितले आहे.

26 जानेवारीच्या घटनांचा उल्लेख करत ट्विटरने म्हटलंय, "आमच्या ग्लोबल टीमने या काळात 24 तास अथक कव्हरेज दिलं आणि ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन करणारा मजकूर, ट्वीट्स आणि अकाऊंट्सवर न्याय्य आणि निष्पक्ष पद्धतीने कारवाई केली आहे."नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शेकडो अकाऊंटवर कंपनीने कारवाई केलेली आहे. विशेषतः अशा अकाऊंटवर ज्यांच्यावरून हिंसाचार, गैरवर्तन आणि धमकी देणारा मजकूर येत होता. सोबतच कंपनीच्या नियमांचं उल्लंघन करणारे काही ट्रेंड्सही थांबवण्यात आले."

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा