India

पुलवामा सेक्टरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

Published by : Lokshahi News

जम्मू -काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांच्या माहिती मिळताच सुरक्षा दलांनी शनिवारी सकाळी नामिबियन आणि मारसर वनक्षेत्र आणि दचीगाम परिसरात घेराव आणि शोध मोहीम सुरू केली,

अधिकाऱ्याने सांगितले की,'ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. तसेच ते कोणत्याही दहशतवादी गटाशी जोडलेले आहेत का हे देखील शोधले जात आहे.' पुलवामा सेक्टरमध्ये काही दहशतवादी लपले आहेत आणि मोठा कट रचण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती भारतीय सुरक्षा दलांना मिळाली होती. गुप्तचरांच्या आधारे सुरक्षा दलांनी स्थानिक पोलिसांसह परिसरात शोधमोहीम सुरू केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा