India

मेक्सिकोमध्ये दोन ट्रकमध्ये भीषण अपघात, ४९ जणांचा मृत्यू, ५८ जण जखमी

Published by : Lokshahi News

मेक्सिकोमध्ये गुरुवारी रात्री उशिरा दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोच्या चियापास राज्यातील दक्षिण-पूर्व मेक्सिकन शहराच्या गुटिएरेझजवळ ट्रक उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात ४९ जण ठार तर ५८ जण जखमी झाले आहेत. बचाव पथकाने ही माहिती दिली आहे. दक्षिण मेक्सिकोतील चियापास प्रांतातून जाणारा ट्रक वळणावळणावर उलटल्याने हा अपघात झाला. या ट्रकमध्ये शंभरहून अधिक लोक होते, त्यापैकी बहुतेक मध्य अमेरिकन देशांतील स्थलांतरित होते.

 स्थलांतरित मध्य अमेरिकन देशांच्या गरिबी आणि हिंसाचाराने भरलेल्या वातावरणातून सुटण्यासाठी मेक्सिकोमार्गे अमेरिकेच्या सीमेवर पोहोचण्याचा प्रयत्न करतात. सुमारे ५८ जखमी लोकांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मेक्सिकोमधील राज्याची राजधानी चियापासकडे जाणाऱ्या महामार्गावर हा अपघात अपघात झाला. घटनास्थळावरील फोटोंमध्ये फुटपाथवर आणि ट्रकच्या मालवाहू डब्यात मृतदेह पडलेले दिसत होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा