India

दोन वर्षांपुर्वी आज लागले होते पहिले लॉकडाऊन अन् आता ३१ मार्चपासून सर्व निर्बंध हटवले…

Published by : Jitendra Zavar

आज २४ मार्च. दोन वर्षांपुर्वी देशात पहिला २१ दिवसांचा लॉकडाऊन लागला होता. आता दोन वर्षांनंतर केंद्राने ३१ मार्च २०२२ पासून कोविडचे सर्व निर्बंध (Unlock India) हटवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ मास्क (mask )आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम लागू असतील. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत निर्देश दिले आहेत. भल्लांनी स्पष्ट केले की, ३१ मार्चनंतर गृह मंत्रालयाकडून यासंदर्भात इतर कोणताही आदेश दिला जाणार नाही. (Corona New Rules)

दोन वर्षानंतर कोरोनाबाबतचे सगळे नियम हटवले (Unlock India) असल्याचे केंद्राकडून जाहीर केले आहे. आता फक्त सोशल डिस्टंसिंग आणि मास्क (Mask) गरजेचा आहे, असेही स्पष्ट करण्यात आलं. केंद्र सरकारने निर्बंध संपूर्ण संपुष्टात आणण्याची घोषणा केली, असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र मास्क लावण्याचा नियम मात्र कायम असणार आहे. येत्या 31 मार्चपासून देशातील कोरोना निर्बंध (Corona New Rules) संपणार आहे. केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत जारी केलेली मार्गदर्शक तत्त्व हठवली जाणार, असल्याचेही केंद्राने म्हटले आहे. मास्कमुक्तीबाबत सध्या निर्णय झालेला नाही. त्यामुळं जनतेला मास्क वापरावाचं लागणार आहे.

केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 (DM कायदा 2005) अंतर्गत 24 मार्च 2020 रोजी प्रथमच कोरोनाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यानंतर अनेक वेळा या मार्गदर्शक तत्त्वात बदल करण्यात आले. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या 24 महिन्यांत महामारी व्यवस्थापनासाठी विविध क्षमता विकसित करण्यात आल्या आहेत. यामध्ये चाचणी, पाळत ठेवणे, संपर्क शोधणे, उपचार, लसीकरण, रुग्णालयांचा विकास यांचा समावेश आहे. यासोबतच कोविडबाबत सर्वसामान्यांमध्येही जागरूकता वाढली आहे. त्यांनी कोविड रोखण्यासाठी मैत्रीपूर्ण वागण्यास सुरुवात केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड