Vidhansabha Election

Uddhav Thackeray : आजपासून उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांना सुरुवात

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • उद्धव ठाकरे आजपासून प्रचाराच्या मैदानात

  • पहिली जाहीर सभा रत्नागिरीत, तर मुंबईत सांगता सभा

  • उद्धव ठाकरेंच्या 20 ते 25 जाहीर प्रचारसभा होणार

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आजपासून उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांना सुरुवात होणार आहे. कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेऊन प्रचार सभांना उद्धव ठाकरे सुरुवात करणार आहेत.

दर्शन झाल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता राधानगरी विधानसभा आदमापुर येथे उद्धव ठाकरे यांची सभा होणार असून कोल्हापूर नंतर रत्नागिरीकडे ते सभेसाठी जाणार आहेत. साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाच्या मैदानावर उद्धव ठाकरे रत्नागिरीमध्ये सभा घेणार आहेत.

कुठे व कधी सभा?

5 नोव्हेंबर - रत्नागिरी

9 नोव्हेंबर - धाराशिव

14 नोव्हेंबर - संभाजीनगर

15 नोव्हेंबर - नाशिक

16 नोव्हेंबर - ठाणे

17 नोव्हेंबर - मुंबई सांगता सभा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर