Vidhansabha Election

Uddhav Thackeray Vaijapur: "लुटेंगे और बाटेंगे" हा भाजपचा नारा, उद्धव ठाकरेंचा मोदी आणि शाहांना टोला

वैजैपुरच्या सभेत उद्धव ठाकरे भाषणादरम्यान शिंदे, मोदी आणि शाहा यांच्यावर निशाणेबाजी करत होते

Published by : Team Lokshahi

वैजैपुरच्या सभेत उद्धव ठाकरे भाषणादरम्यान शिंदे, मोदी आणि शाहा यांच्यावर निशाणेबाजी करत होते त्यावेळेसे भाषणाच्या वेळी उद्धव ठाकरे योगी आदित्यनाथ यांच्या सध्या चर्चेत असलेल्या 'बटेंगे तो कटेंगे' या वक्तव्यावरून भाजपवर टीका करत असताना म्हणाले "लुटेंगे और बाटेंगे" हा भाजपचा नारा आहे यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. 'महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तों मे बाटेंगे' हा यांचा विचार आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. डोळ्यासमोरून आपला महाराष्ट्र लुटून गुजरातला नेत आहेत आणि आम्ही काय बघत बसणार का? जर शिवसेना नसती तर भाजपच नामोनिशाण महाराष्ट्रात राहील नसत. जो भाजप आम्ही वाढवला, जोपासला त्यांनीच आमच्या बरोबर गद्दार पना केला.

मझ्या बॅग तपासता, मोदी तुम्ही जर मिंद्याच्या प्रचार सभा घ्यायला जाता तर मिंड्याच्या बॅग पण तपासा. 370 कलम रद्द केलं तेव्हा शिवसेना तुमच्यासोबत होती पण तुम्ही आता सांगताना सांगता की उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाच्या विरुद्ध आहेत. मग काश्मीरमधील जेव्हा तुम्ही मुफ्तीसोबत बसला होतात तेव्हा कुठ गेलं होत तुमचं हिंदुत्व? असा प्रश्न देखील उद्धव ठाकरेंनी केला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवरून उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका

मझ्या वडिलांचा फोटो सुद्धा यांनी चोरलेला आहे म्हणजे यांना यांच्या वडिलांच्या फोटोचा अभिमान नाही आहे का? शिंदे जर तुझ्यात दम असेल तर माझ्या वडिलांचा फोटो न वापरता तुझ्या वडिलांचा फोटो वापरून दाखव आणि ये मैदानात असं आव्हान उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना दिल आहे. मी काही बोलून निघून जाणारा भाजप किंवा शिंदे नाही आहे. तुम्ही जर मला आमदार दिला तर मी तुम्हाला काहीतरी देऊ शकेल असं आश्वासन देखील उद्धव ठाकरेंनी जनतेला दिल आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद