Vidhansabha Election

Ulhasnagar Assembly Election 2024 Result: उल्हासनगरमध्ये ओमी कलानी यांचा पराभव करत कुमार आयलानी विजयी

उल्हासनगर विधानसभा निवडणूक 2024 मध्ये कुमार आयलानी यांनी ओमी कलानी यांचा पराभव करत 30754 मतांनी विजय मिळवला. आयलानी यांनी शहराच्या विकासासाठी पुढील 5 वर्षात अनेक कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

Published by : shweta walge

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून भाजप कडून कुमार आयलनी यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ओमी कलानी यांचा पराभव करत 30754 मतांनी दणदणीत विजयी मिळवला आहे. शहरातील सर्व नागरिकांचे व्यापारी वर्ग, ज्येष्ठ नागरिक विशेष करून लाडकी बहिणीचे आभार मानले आहे, तसेच पोलीस प्रशासन आणि शासकीय प्रशासनाचे देखील आभार मानले,येत्या 5 वर्षात शहरातील अनेक विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करणार असे म्हणाले.

आयलानी ३० हजार ७५४ मतांनी विजयी झाले आहेत. आयलानी यांना ८२ हजार २३१ मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे ओमी कलानी यांना ५१ हजार ४७७ मते मिळाली आहेत. ओमी कलानी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रचारात केंद्रस्थानी ठेवल्याने कुमार आयलानी यांना फायदा झाल्याचे बोलले जाते. गेल्या दोन दशकात उल्हासनगर विधानसभेत आलटून पालटून आमदार निवडून येत होते. मात्र यंदा आयलानी यांनी या परंपरेलाही छेद दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद