बाप्पा आता काही दिवसांनी प्रत्येकाच्या घरात आगमन करणार आहे. यादरम्यान अनेक ठिकाणी बाप्पाच्या सजावटीसाठी भाविकांचा गडबड गोंधळ उडताना पाहायला मिळत आहे. एक वर्षानंतर येणाऱ्या बाप्पाच्या आगमनाची वाट प्रत्येक जण आतुरतेने पाहत असतो. त्या आधीची सजावटीची तयारी घरातील बाप्पासाठी तयार केले जाणारे मखार.
बाप्पाची आभुषणे, बाप्पासाठी खरेदी केले सुंदर दागिने आणि त्याआधी केली जाणारी बाप्पाची खरेदी यासर्व गोष्टींसाठी प्रत्येक जण बाप्पाची डोळे वाटेला लावून वाट बघत असतो. अनेक ठिकाणी बाजारपेठ बाप्पाच्या सजावटीच्या सामानाने सजलेली पाहायला मिळत आहेत.
अशातच गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला असताना उल्हासननगरमधील बाजारपेठ भरलेल्या आहेत. बाप्पांच्या उत्सवासाठी पूजेच्या साहित्याने उल्हासननगरमधील नेहरू चौकातील मार्केट सजले आहे. स्वस्त व विविध प्रकारचे साहित्य याठिकाणी उपल्ब्ध आहेत.
तर या साहित्यांच्या खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक शहरात आल्याने मार्केट गर्दीने फुलून गेले आहे. दुकानात सजावटीची रंगीबेरंगी कृत्रिम फुले, विविध वेली, स्पंजची विविध आकाराची मखर, तोरण, पूजेचे साहित्य, विडा, बाप्पाचे हार,कमरपट्टा, कंठी माळ, दिव्यांच्या माळा, आसन आदी वस्तू पाहायला मिळत असून या वस्तूंनी दुकाने सजली आहेत.