Vidhansabha Election

Mohol Vidhan Sabha | मोहोळमध्ये राष्ट्रवादीला धक्का, 'या' नेत्याने सोडली Ajit Pawar यांची साथ

मोहोळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ता उमेश पाटील यांनी आपल्या मु्ख्य प्रवक्ता पदाचा अखेर राजीनामा दिला आहे.

Published by : shweta walge

मोहोळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ता उमेश पाटील यांनी आपल्या मु्ख्य प्रवक्ता पदाचा अखेर राजीनामा दिला आहे. उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अधिकृतपणे राजीनामा पाठवत भूमिका मांडली आहे. या राजीनाम्यात त्यांनी आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील यांच्याविरोधात भूमिका मांडली आहे. “मोहोळ येथील जनसन्मान यात्रे निमित्त आल्यानंतर आपण व अजित दादांनी माझ्या बाबतीत पक्ष शिस्तीच्या संदभनि काही विधाने केली. अर्थात तो आपला अधिकार आहे. मी सध्या पक्षाच्या मुख्य प्रवक्ता या पदावर असताना मोहोळ विधानसभेचे पक्षाचे विद्यमान आमदार यशवंत माने आणि माझी आमदार राजन पाटील यांच्यावर सातत्याने जाहीर टीका करत असल्याने मी पक्षाची शिस्त एकदा नव्हे तर अनेकवेळा मोडली आहे हे मला मान्य आहे. म्हणून मी विनम्रपणे पक्षाच्या मुख्य प्रवाक्ता पदाचा राजीनामा देत आहे”, असं उमेश पाटील आपल्या राजीनाम्यात म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा