कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने कोरोनावर मात केली असून त्याला एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर त्याची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे.
छोटा राजनची 22 एप्रिल रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर प्रकृती बिघडल्यामुळे 25 एप्रिल रोजी त्याला दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यांनतर आता त्याने कोरोनावर मात केलीय. छोटा राजन याची प्रकृती आता चांगली असून त्याला AIIMS मधून डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यानंतर त्याची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे. छोटा राजन याला तिहार जेल नंबर 2 मध्ये कडेकोट सुरक्ष्या व्यवस्थेत ठेवण्यात आलंय.
तब्बल 26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकणी गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जानेवारी महिन्यात ही शिक्षा सुनावली होती.