युक्रेनहून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे मुंबई विमानतळावर उपस्थित 
International

Russia – Ukraine War | युक्रेनमधील १८२ विद्यार्थी मायदेशी परतले; मुंबई विमानतळावर केंद्रीय मंत्र्यांकडून स्वागत

Published by : Shweta Chavan-Zagade

रशिया आणि युक्रेन (Russia – Ukraine War) यांच्यात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा (Operation Ganga) ही मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेतंर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचं विमान आज (1 मार्च) सकाळी बुखारेस्टवरून मुंबईत आलं. या विमानातून जवळपास 182 विद्यार्थी मुंबईत परतले. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)  या विद्यार्थ्यांच्या स्वागताला उपस्थित होते. नारायण राणे यांनी थेट विमानात जाऊन या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना युक्रेनहून परत आणण्याच्या मोहीमेवरून सध्या श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे. गेल्यावेळी युक्रेनहून मुंबईत (mumbai airport) विमान आले तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (shivsena and ncp) कार्यकर्तेही विमानतळाबाहेर उपस्थित होते. तर दुसरीकडे भाजपकडून (bjp) विमान मुंबईत आल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांना पाठवून या मोहीमेच्या श्रेयात आणखी कोणीही वाटेकरी असणार नाही, याची पूरेपूर काळजी घेतली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ऑपरेशन गंगा (Operation Ganga) या मोहिमेंतर्गत आतापर्यंत युक्रेनहून 600 विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात आले आहे.

रशिया आणि युक्रेन (Russia – Ukraine War) यांच्यात युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर मोठं आक्रमण केल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना तेथून परत आणण्यासाठी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑपरेशन गंगा (Operation Ganga) लॉंच केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा