Vanchit Bahujan Aaghadi  
Vidhansabha Election

विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी वंचित बहुजन आघाडीचं ट्विट

वंचित बहुजन आघाडीने केलं ट्विट

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून उद्या मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून कोणाचं सरकार सत्तेत येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या अपक्ष उमेदवारांना संपर्क केला जात असल्याची देखील माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी वंचित बहुजन आघाडीने ट्विट केलं आहे.

वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत म्हटले आहे की, जर उद्या महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही जो कोणी सरकार बनवू शकतो त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ.आम्ही सत्ता निवडू ! आम्ही सत्तेत राहायला निवडू ! असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा