अध्यात्म-भविष्य

दिवाळीचा पहिला दिवा वसुबारस; जाणून घ्या शुभ मुहुर्त, पूजा आणि महत्त्व

दीपोत्सवाची सुरुवात वसुबारस सणाने केली जाते. भारत हा कृषिप्रधान देश असून गाईला मातेचा दर्जा देण्‍यात आला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Vasubaras 2023 : दीपोत्सवाची सुरुवात वसुबारस सणाने केली जाते. भारत हा कृषिप्रधान देश असून गाईला मातेचा दर्जा देण्‍यात आला आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. पंचांगानुसार दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी सण साजरा केला जातो.

वसुबारस का साजरी केली जाते?

द्वापार काळापासून वसुबारस उत्सव साजरा करण्याची परंपरा चालत आली आहे. कार्तिक शुक्ल प्रतिपदेपासून कार्तिक शुक्ल सप्तमीपर्यंत भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत धारण केला होता, असे म्हणतात. यानंतर आठव्या दिवशी इंद्रदेवाचा अहंकार संपला आणि ते श्रीकृष्णाकडे क्षमा मागण्यासाठी आले. तेव्हापासून या दिवशी म्हणजेच अष्टमी तिथीला वसुबारस साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.

बसुबारस गायीच्या पूजेचे महत्त्व

गायीमध्ये ३६ कोटी देवी-देवतांचा वास असल्याचे मानले जाते. देव आणि दानवांमध्ये जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा त्यातून 14 मौल्यवान रत्ने निघाली, त्यापैकी कामधेनू गाय ही एक आहे. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गाय-वासराची पूजा केली जाते. या दिवशी गायीची पूजा केल्याने सुख, सौभाग्य आणि समृद्धी मिळते. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.

वसुबारस तारीख आणि मुहूर्त

9 नोव्हेंबर 2023 रोजी वसुबारसचा सण साजरा केला जाईल. 9 नोव्हेंबर रोजी पहाटे 5:21 वाजता सुरू होईल आणि शुक्रवार 10 नोव्हेंबर रोजी पहाटे 3:18 वाजता समाप्त होईल.

वसुबारस पूजा विधी

वसुबारस दिनी गाईची पूजा केली जाते. या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. गाईच्या पायावर पाणी घालून हळद-कुंकू आणि अक्षता वाहिल्या जातात. वसुबारण सणाच्या दिवशी गहू, मूग खात नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा