RAJ THACKERAY 2008 ARREST CASE COURT HEARING 89 ACCUSED FINED 
व्हिडिओ

Raj Thackeray : 2008 मधील राज ठाकरेंच्या अटकेवेळी आंदोलन प्रकरणी वांद्रे कोर्टात सुनावणी पार पडली

MNS Protest: 2008 मधील राज ठाकरे अटकेवेळी झालेल्या आंदोलन प्रकरणी आज वांद्रे कोर्टात सुनावणी पार पडली.

Published by : Dhanshree Shintre

2008 मधील राज ठाकरे यांच्या अटकेवेळी झालेल्या आंदोलनाप्रकरणी आज वांद्रे कोर्टात सुनावणी पार पडली. रेल्वे भरती परीक्षेदरम्यान उत्तर भारतीय विद्यार्थ्यांविरोधात झालेल्या या आंदोलनात तब्बल 89 मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

आजच्या सुनावणीला सर्व 89 आरोपींना हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. यावेळी सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले मात्र त्यावेळी मनसेत असलेले अखिल चित्रे आणि आता मनसेतून भाजपमध्ये गेलेले हाजी अराफत शेख न्यायालयात उपस्थित होते. मात्र, वारंवार तारखांना दांडी मारणाऱ्या आणि हजर न राहणाऱ्या आरोपींवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कोर्टाने अशा आरोपींना 500 रुपयांचा दंड ठोठावला असून ज्यांच्यावर वॉरंट बजावण्यात आले होते, त्यांनी न्यायालयात हजर राहून ते रद्द करून घेतले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 एप्रिल रोजी होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा