संभाजीनगरमध्ये 21 कोटींचा घोटाळा करणा-या क्रीडा विभागातील कर्मचा-याच्या प्रेयसीला पोलिसांनी अटक केलीये.या प्रकरणी नवनवे खुलासे होताय.
अवघ्या 11 महिन्यांत 21.59 कोटींचा घोटाळा करणाऱ्या हर्षकुमारने स्वतःच्या मैत्रिणीला देखील या घोटाळ्याचा भागीदार केले होते. पोलिसांच्या विमानतळासमोरील तपासणीत उच्चभ्रू सोसायटीमध्ये मैत्रिणीच्या नावाने दीड कोटी रुपयांचा अल्ट्रा लक्झरियस फ्लॅट खरेदी केला होता. आता जिच्यासाठी आलिशान फ्लॅट घेतला त्याच हर्षकुमारच्या संपत्तीची माहिती, पुरावे मैत्रिणीकडे आहेत.