थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Yavatmal Farmer ) महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण गंभीरपणे वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीने खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन पिकांचा मोठे नुकसान झाले. मालाला योग्य तो भाव न मिळाल्याने कर्जाचा बोजा वाढल्याने शेतकरी हतबल झाले.
यातच यवतमाळ जिल्ह्यात 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. जानेवारी महिन्यात 22 शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याची माहिती मिळत असून यवतमाळ जिल्ह्यातील धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
Summary
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण गंभीरपणे वाढल्याचे पाहायला मिळतंय
31 दिवसात 22 शेतकऱ्यांची आत्महत्या
यवतमाळ जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार