व्हिडिओ

Sharad Mohol : शरद मोहोळ प्रकरणी 3 जणांना अटक

शरद मोहोळ प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता 13वर पोहोचली आहे.

Published by : Team Lokshahi

शरद मोहोळ प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता 13वर पोहोचली आहे. आदित्य गोळे (वय 24), नितीन खैरे यांच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री या तिघांना अटक केली आहे. शरद मोहोळचा खून करण्यापूर्वी आरोपींनी मुळशी तालुक्यातील हाडशी परिसरात गोळीबाराचा सराव केला होता. त्यावेळी आरोपी नितीन खैरे हा मुन्ना पोळेकर यांच्यासह त्या ठिकाणी हजर होता. याशिवाय शरद मोहोळचा खून करण्यासाठी आरोपींनी एक महिन्यापूर्वी कट रचला होता. यासाठी लागणाऱ्या संपूर्ण पैशाची व्यवस्था ही नितीन खैरे याने केली होती. तर आदित्य गोळे यांनी बंदुकीसाठी पैसे पुरवले होते. 5 जानेवारी रोजी दिवसाढवळ्या सुतरदारा येथील राहत्या घराजवळ शरद मोहोळ याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. शरद मोहोळचे साथीदार असलेल्या मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनीच त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस; डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करुन दिल्या शुभेच्छा

Latest Marathi News Update live : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

Kolhapur Ambabai Mandir : अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन आज बंद राहणार

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश