हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील साखरा तांडा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. या गावातील विहिरीत एक पिसाळलेला कुत्रा पडला. कुत्र्याच्या पिसाळलेल्या अवस्थेत असण्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली.
गावकऱ्यांनी विहिरीतील पाणी प्यायल्यानंतर आरोग्याच्या दृष्टीने धोका निर्माण होऊ शकतो, याची चिंता व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीला गंभीरतेने घेत, स्थानिक आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना केल्या आहेत. त्याचबरोबर 180 गावकऱ्यांचे अँटी रेबीज लसीकरण करण्यात आलं आहे. जेणेकरून रेबीजसारख्या संसर्गजन्य आजारांपासून बचाव होईल. या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण पसरलं आहे. प्रशासनाने या घटनांनेची गांभीर्याने दखल घेतली आहे.
रेबिज पाण्यातून पसरू शकतो का?
रेबीज हा एक विषाणूजन्य आजार आहे. जो प्रामुख्याने संक्रमित प्राण्यांच्या लाळेमधून किंवा लहान जखमेतून होणाऱ्या संपर्काद्वारे पसरतो. पाण्यातून रेबीज पसरण्याची शक्यता नाही. रेबीज विषाणू पाणी किंवा अन्य द्रवांमध्ये जिवंत राहू शकत नाही. मात्र, जर संक्रमित कुत्रा किंवा इतर प्राणी पाण्यात पडले आणि त्याच्या लाळीचा थोडा भाग त्या पाण्यात गेल्यावर ते पाणी पिणाऱ्या व्यक्तीच्या जखमेपर्यंत पोहोचलं, तर संक्रमण होऊ शकते. त्यामुळे, संक्रमित प्राण्यांच्या लाळीचा थेट संपर्क किंवा चावल्याने रेबीज होण्याचा धोका असतो, पाण्यातून नाही. तरीही, रेबीजचा धोका टाळण्यासाठी योग्य लसीकरण आणि सावधगिरी आवश्यक आहे.