सध्या नवी मुंबईत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हायरल व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवतो आहे. हे बघून तुम्हाला धक्का बसेल. नवी मुंबईतील एका चारचाकी गाडीच्या डिक्कीतून एक हात बाहेर निघालेला असून तो हात लटकताना दिसतो आहे. या हाताच्या हालचाली देखील दिसत आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहरात एकच खळबळ उडाली आहे. यामागे काही घातपात आहे का असा संशय देखील वर्तवला जातो.
रस्त्यावरील या गाडीच्या मागे असलेल्या काही वाहनधारकांनी या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ मोबाईलच्या कॅमेरात चित्रित केला आहे. त्यामुळे ही गाडी नेमकी कोणाची आणि गाडीच्या डिक्कीतून बाहेर लटकणारा हात कुणाचा याचीच चर्चा आता रंगली आहे. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यान असणाऱ्या सर्विस रोडवर एका इनोव्हाच्या डिक्कीतून हात बाहेर दिसलेला आहे.
हा हात जो आहे तो मृत शरीराचा आहे किंवा कोणाला किडनॅप केल्याचा आहे याविषयी कोणतीच माहिती अद्याप मिळालेली नाही. सदर इनोव्हा गाडी ही वाशी रेल्वे टेशन पासून सानपाडा रेल्वे स्टेशनकडे जात होती. याबाबत जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.