व्हिडिओ

Dharashiv Crime : तुळजापूर हादरलं!, छेडछाडीला कंटाळली, पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल

तुळजापूर: पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीची आत्महत्या; छेडछाडीला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल.

Published by : Riddhi Vanne

तुळजापूर शहरातील एस.टी. ST Colony कॉलनी परिसरात राहणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल Police Constableच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलीला तिच्या ओळखीच्या व्यक्तीकडून सतत त्रास दिला जात होता. 'माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकेन' अशी धमकी संबंधित युवक वारंवार देत होता. काहीवेळा आरोपीने सोशल मीडियाsocial media वर तिचे व्हिडिओ/फोटो पोस्ट केले सुद्धा आहेत आणि याच मानसिक धक्क्या mental shock तून पीडितेने आत्महत्या केली.

याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीसह त्याच्या एका साथीदाराला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. मात्र, सद्यस्थितीत पोलीस प्रशासनाने अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. लोकशाही मराठीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांशी संवाद साधला. स्थानिक नागरिकांनी या प्रकाराची तीव्र निषेध व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

ही घटना केवळ एका कुटुंबाचे दुःख नसून संपूर्ण समाजासाठी धोक्याचा इशारा आहे. सोशल मीडिया Social Media चा गैरवापर थांबवण्यासाठी अधिक कठोर पावले उचलण्याची गरज आता अधोरेखित झाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा