बीड जिल्ह्यामध्ये आकाशातून अचानक दगड पडल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तहसील प्रशासन आणि भूवैज्ञानिकांनी घटनास्थळी पाहणी केली. मात्र, दगड पडण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संतोष देशमुखांच्या प्रकरणामुळे बीड जिल्हा चर्चेत असताना आता ४ मार्च रोजी पुन्हा खळबळजनक घटना घडली. बीड जिल्ह्यामधील वडवाणी तालुक्यात अचानक आकाशातून दगड पडल्याची घटना घडली. आकाशातून दगड पडल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. तहसील प्रशासाने हे दगड ताब्यात घेतले. तसेच छत्रपती संभाजीनगर भूवैज्ञानिकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र गावांमध्ये अजून दहशतीचे वातावरण आहे.