रायगड जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी पाणीपात्रातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे बिरदोले गावातील तरुण रोशन कचरू कालेकर वय- 25 वर्ष हा शेतावर काम करीत असताना विज पडून मृत्यू झालेला आहे. सदर ठिकाणी नेरळ पोली ठाणे पप्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे पोहचले असून पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे.