ठाकरेंची बदनामी करणारा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये असणारे हॉटेल ठाकरेंचे आहे असा दावा यापोस्टमध्ये करण्यात आला आहे. याबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी विनायक राऊत पोलिस ठाण्यामध्ये पोहचलेले होते. यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
याचपार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे म्हणाले की, मी पण पाहिलं की कुठुन तरी कोण तरी वर येत आणि खाली जात आहे, याचा संबंध काय? मी पण यासंबंधी सायबरसेलमध्ये गुन्हा दाखल करणार आहे... कारण असे फालतू चाळे कोणी तरी करत असतं, कोणाचं तरी नाव चिटकवायचं कोणाची तरी बदनामी करायची...
ज्याच्यामध्ये हिम्मत असेल त्याने समोर येऊन बोलावं, कोणाची तरी व्हिडिओ घ्यायची ती सोशल मीडियवर टाकाची आणि कोणाची तरी बदनामी करायची हे अशे चाळे एकच पक्ष करतो आणि निवडणुक जिंकण्याचा प्रयत्न करतो पण आम्ही नक्कीच याविषयी चौकशी करु आणि तक्रार देखील करु, असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे.