राज्यात रविवारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजपचे 19 शिवसेना शिंदे गटाचे 11 आणि अजित पवार गटाच्या 9 आमदारांनी शपथ घेतली. दरम्यान राज्यभर गाजलेल्या मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसींची भूमिका मांडणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मात्र मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं.
तर शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार मी नाराज नाही, अल्पसंख्यांक समुदायाचा चेहरा म्हणून मंत्रिमंडळात हसीन मुश्रीफ आहेत असं वक्तव्य केलंय.