व्हिडिओ

Abhijit Bichukale : अभिजित बिचुकले निवडणुकीच्या मैदानात

साताऱ्याचे कवी मनाचे नेते आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे येत्या 19 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Published by : Dhanshree Shintre

साताऱ्याचे कवी मनाचे नेते आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे येत्या 19 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उदयनराजेंना संधी मिळाली आता जनतेने यावेळी मला संधी द्यावी असं अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत. अभिजीत बिचुकले त्यांच्या वेगवेगळ्या चर्चेमुळे चर्चेत असतात. ते आता उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करताना दिसत आहेत.

19 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अभिजीत बिचुकले म्हणाले की, मतदार राजा जागृत आहे आणि येत्या 19 एप्रिल ला मी अर्ज भरणार आहे. भाजपमध्ये उमेदवारी मिळावी ही उदयन दादांची इच्छा होती, ती पूर्ण झाली पण भाजपने छत्रपतींना किती सन्मान दिला याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी करावे. आणि लोकांनी पण करावे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा