व्हिडिओ

Navi Mumbai : नवी मुंबईत अनधिकृत होर्डिंगवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना घडताच नवी मुंबई शहरातील होर्डिंगवर कारवाई करण्याचे काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब हाती घेतले आहे.

Published by : Dhanshree Shintre

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना घडताच नवी मुंबई शहरातील होर्डिंगवर कारवाई करण्याचे काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब हाती घेतले आहे. नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग लावलेले आहेत. त्यात अनधिकृत होल्डिंगच्या संदर्भात शासनाने उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यांसंदर्भात नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पहाटेपर्यंत कारवाई करण्यात आली आहे.

दिडशे ते दोनशे पालिकेचे कर्मचारी, टेक्निकल टीम, गॅस कटिंगची टीम पहाटेपर्यंत कार्यरत काम करत होते. पालिकेचे आठ वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर आणि त्यांची टीम कार्यरत होती. येणाऱ्या काळात ह्या होर्डिंगच्या संदर्भात जे 201 अधिकृत होर्डिंगच्या व्यतिरिक्त जे अनधिकृत होल्डिंग आहे, त्यांच्यावर निकषांची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात अनधिकृत होल्डिंगवर दंडात्मक आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना सर्व वॉर्ड ऑफिसरांना दिल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

Pune : पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर जखमी