अभिनेता शाहरुख खान धमकी प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. रायपूरवरून अटक करण्यात आलेल्या फैजान खानने शाहरुखच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांची तसेच आर्यन खानची माहिती काढली असल्याचे समोर आलं आहे.
ऑनलाइन सर्चकरून शाहरुख खानच्या सुरक्षेची तसेच मुलगा आर्यनची माहिती काढली असून फैजान खानच्या चौकशीत आणि मोबाईलच्या तपासणीत हा धक्कादायक खुलासा झाला आहे. अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देऊन 50 लाखांची खंडणी मागितली होती.