ADANI ENERGY SOLUTIONS INSTALLS 1 CRORE SMART METERS IN INDIA, HISTORIC ENERGY MILESTONE ACHIEVED 
व्हिडिओ

Adani Energy Solution: एक कोटी स्मार्ट मीटर बसवण्याचा इतिहास, अदानी एनर्जी सोल्यूशनचा ऐतिहासिक टप्पा

Smart Meters: अदानी एनर्जी सोल्यूशन्सने भारतात १ कोटी स्मार्ट मीटर यशस्वीरित्या बसवून ऐतिहासिक टप्पा गाठला.

Published by : Dhanshree Shintre

भारतातील अग्रगण्य एकात्मिक ऊर्जा समाधान कंपनी अदानी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेडने देशभरातील वीज वितरण कंपन्यांमध्ये यशस्वीरित्या 1 कोटी स्मार्ट वीज मीटर बसवून महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

भारतात आणि कदाचित जागतिक स्तरावरही अशी कामगिरी करणारी ही पहिली कंपनी ठरली आहे. पुढील आर्थिक वर्षात आणखी 1 कोटी स्मार्ट मीटर बसवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. एडव्हान्स्ड मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस प्रोव्हायडर (एएमआयएसपी) म्हणून अदानी एनर्जी सोल्यूशन्सला पाच राज्यांमध्ये सुमारे 2.5 कोटी स्मार्ट मीटर बसवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

दररोज सुमारे 25,000 मीटर बसवण्याचा वेग हा उद्योगातील सर्वाधिक मानला जात आहे. अदानी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेडचे स्मार्ट मीटर नेटवर्क ग्राहकांना रिअल-टाइम वापराची माहिती देते, बिलिंगमध्ये पारदर्शकता वाढवते आणि वीज वितरण कंपन्यांच्या कामकाजाची कार्यक्षमता सुधारते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा