व्हिडिओ

Bharat Gogawale : "झेंडा वंदनाचा अधिकार दिला म्हणजे..." ; गोगावले म्हणाले,

महाराष्ट्रदिनी आदिती तटकरे व गिरीश महाजन यांना ध्वजवंदनाचा मान, भरत गोगावले यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया.

Published by : Prachi Nate

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असताना महाराष्ट्रदिनी आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांना ध्वजवंदनाचा मान देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना 'सब्र का फल मीठा होता हैं', अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. तर मंत्री अदिती तटकरे यांनी उत्तर देणं टाळल आहे.

दरम्यान भरत गोगावले म्हणाले की, "प्रत्येकाला अधिकार दिले आहेत. झेंडावंदन म्हणजे पालकमंत्री पद दिलं असं होतं नाही. मी अजून तलवार म्यान केली नाही. मला वाटतं पालकमंत्री मला मिळेल म्हणून तर चाललं आहे. पूर्वी त्यांना दिलेलं पालकमंत्री पद म्हणून झेंडावंदनाचे अधिकार त्यांना दिले आहेत. झेंडावंदन तिकडे आणि पालकमंत्री आमच्याकडे असं दिसत आहे. "सबर का फल मिठा होता हैं". अदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद द्यायचं नाही म्हणून तर अजून कुणाला दिलेलं नाही", असं भरत गोगावले म्हणाले म्हणाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Asia Cup : भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पुन्हा आमनेसामने

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप