व्हिडिओ

Aditi Tatkare On Badlapur Case : बदलापूरात ८ तासांपासून आंदोलन सुरूच

दोन चिमुकल्यांवर अत्याचार झालेले आहेत आणि त्यादरम्यान आरोपीला देखील ताब्यात घेतले आहे. लैंगिक अत्याचाराचे आंदोलन आता तापलेले आहे. या घटनेवर आदिती तटकरे प्रतिक्रिया देत म्हणाल्या,

Published by : Team Lokshahi

बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या आंदोलनादम्यान गिरिश महाजन यांच्यावर पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या आहेत. आंदोलक पुर्णपणे आता संतप्त झाले आहेत. गिरिश महाजन हे समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आंदोलक त्यांच काहीच ऐकूण घेण्याच्या मनस्थित नाही आहेत. मागच्या 8 तासापासून हे आंदोलन सुरु आहे त्यामुळे रेल्वेसेवा देखील ठप्प झालेल्या पाहायला मिळाल आहे.

बदलापुरातील ही अत्यंत धक्कादायक आणि किळसवाणी घटना घडली, खरं तर महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसें-दिवस वाढत चाललेल्या आहेत. कोलकाताची घटना नुकतीच झाली आणि ती घटना ताजी असताना आता अशा प्रकारची घटना बदलापूरमध्ये घडताना पाहायला मिळाली आहे. दोन चिमुकल्यांवर अत्याचार झालेले आहेत आणि त्यादरम्यान आरोपीला देखील ताब्यात घेतले आहे. लैंगिक अत्याचाराचे आंदोलन आता तापलेले आहे.

या घटनेवर आदिती तटकरे प्रतिक्रिया देत म्हणाल्या, जे घडलं आहे ते चुकीचं आहे. म्हणून आम्ही साधारणपणे या संदर्भातला अहवाल ज्यावेळी आम्ही आमच्या अधिकाऱ्यांन कडून कारण त्यांनी चाइल्ड हेल्प लाईनला संपर्क झालेला होता. गुन्हा नोंदवून घेत असताना अधिकारी त्याठिकाणी होते. त्यामुळे त्यांच्याकडून जो प्रथमदर्शनी अहवाल आमच्याकडे जमा झालेला आहे. त्यावेळी सीसीटीव्ही आहेत शाळेमध्ये त्याची फुटेजेस त्यांनी पोलिसांकडे देण हे अपेक्षित आहे.

दुसर म्हणजे स्थिक शालेय व्यवस्थापन समितीने या संदर्भात काही प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला असेल, आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावर कारवाई ही निश्चित झालीच पाहिजे. ज्यावेळी शाळेतील मुलं ही शाळेच्या आवारात असतात शाळेत असतात त्यावेळी त्या मुलांची पुर्ण जबाबदारी ही त्या शाळेतील शिक्षणाची आणि तेथील व्यवस्थापकांची असते. अशामध्ये जर अशी दुर्घटना घडलेली असेल तर अशा प्रकारची कोणतीही घटना ही खपवून घेतली जाणार नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा