गिरगांव शोभा यात्रेला सुरुवात झाली आहे मुंबईतली प्रसिद्ध अशी ओळख असलेल्या गिरगांव स्वागत यात्रेत यंदा अनेक चित्रारथ पाहायला मिळत आहेत. या माध्यमातून अनेक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातं आहे. तिथेच दुसरीकडे यात्रेची शोभा वाढवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील नेते आदित्य ठाकरे आणि खासदार अरविंद सावंत यांनी देखील उपस्थितीत लावली आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी शोभायात्रेत ढोल वादन केले आहे.
त्याचसोबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे गुढीपाडवा शोभा यात्रेदरम्यान वरळीत सहभागी झाले. यावेळी आमदार सचिन अहिर देखील उपस्थित होते. तसेच माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील सर्व जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
आदित्य ठाकरे म्हणाले की, "सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा... हे वर्ष सुखाचं समृद्धीच जावो ही प्रार्थना... मी संकल्प काही करत नाही, वरळीमध्ये आंनद आणि उत्साह आपल्याला दिसत आहे भक्तिमय वातावरण हे वरळीत दिसतयं".