व्हिडिओ

Thane: मेट्रोच्या खांबावर जाहिराती लावण्यास बंदी

Published by : Team Lokshahi

ठाणे शहराच्या हद्दीत मॉडेला मिल नाका ते गायमुख आणि बाळकुम या भागात उभ्या राहिलेल्या मेट्रो रेल्वेच्या खांबावर कोणत्याही स्थितीत भित्तीपत्रके, फलक, होर्डिंग्ज लावता येणार नाहीत. हे फलक चिकटवून शहर विद्रुपीकरण केल्यास दंड आकारण्याबरोबरच गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, महापालिका क्षेत्रात दर बुधवारी अनधिकृत फलक सफाईची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. तिन्ही परिमंडळाचे उपायुक्त आणि सर्व प्रभाग समितीचे सहायक आयुक्त यांनी त्यांच्या हद्दीत ही मोहीम राबवावी. या मोहिमेत सर्व अनधिकृत फलक काढले जातील याची दक्षता घ्यावी, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले आहे.

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."