जम्मू- काश्मिरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यांमातून घेतला. पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. यामध्ये 100 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ऑपरेशन सिंदूर Operation Sindoor अद्याप सुरु असल्याचे स्पष्ट केले आहे.