बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या तसेच सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. बदलापूरमधील एका शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने ज्याचं नाव अक्षय शिंदे असं होत त्याने हे दृष्कृत्य केलं होत. ही घटना उजेडात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने संताप व्यक्त केला होता.
बदलापूर अत्याचार घटनेनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 1958 जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे. तसेच राज्य शासनाने सूचना दिल्यानंतर केवळ पाच महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व 1958 प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची कामगिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने करून दाखवली आहे.
त्यामुळे कोल्हापूर हा विद्या सुरक्षित जिल्हा म्हणून राज्यात पहिला आल्याची माहिती राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे. दरम्यान मिशन शाळा कवच ही मोहीम युद्ध पातळीवर हाती घेतली असून आता जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये 7832 कॅमेरे बसवण्यात आले आहे.यासाठी ग्रामपंचायत लोकसहभागातून साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले.