महादेव गीत्तेसह इतर काही कैद्यांना संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवलं. बीड जिल्ह्यात सकाळी दोन कैद्यामध्ये मारामारीची घटना घडली होती. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महादेव गीत्तेसह इतर काही कैद्यांना हर्सूल कारागृहात हलवलं. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन मारहाण झाल्याचा आरोप करण्यात देखील करण्यात आलेला आहे.
बीडमधील मस्साजोग येथील संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना कारागृहामध्ये मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. कारागृहात सकाळच्या सुमारास महादेव गिते आणि अक्षय आठवले या दोघांनीही वाल्मीक कराडला मारहाण करायला सुरुवात केली, त्याचवेळी त्यांच्यामध्ये वाद आणि मारामारी झाली. यावरुन आता नवं प्रकरण बाहेर येत आहे. बबन गिते याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली जी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.