महायुती सरकारमध्ये रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (अजित पवार) पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्षात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असताच आता मोठी अपडेट समोर आली आहे.
राष्ट्रावादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले हे दोघेही एकाच मंचावर पाहायला मिळाले. त्यामुळे आता रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का? अशी चिन्ह दिसत आहे.