व्हिडिओ

Ajit Pawar | 'महायुतीत कोणत्याही जागेवर तिढा नाही' अजित पवार यांची माहिती

Published by : shweta walge

काही जागा ठरवण्याबाबत विलंब लागतो आघाडी असेल किंवा महायुती असेल तर काही जागा निश्चित करण्यामध्ये विलंब लागत असतो पण लवकरच याबाबत निर्णय होईल असं अजित पवार यांनी स्पष्ट केले. पिंपरी चिंचवड मध्ये थेरगाव इथ रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तोपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटेल अशी मिश्किल टिप्पणी ही अजित पवार यांनी केली. प्रवीण माने हा मूळचा माझाच कार्यकर्ता असल्याचं सांगत माने यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाला अजित पवार यांनी एक प्रकारे दुजोराच दिला. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीतील सर्वजण घड्याळ धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हावरील उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करतील असंही ते म्हणाले. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या वृत्तावर बोलताना त्यांचे बरेच दिवस घालमेल सुरू होती आता त्यांना निर्णय घ्यावसं वाटलं असेल असेही ते म्हणाले.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...