मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना एक विधान केलं होते. "मागच्यावर्षीची मराठी शाळेची एकून संख्या जळगावच्या ग्रमीण शाळांची होती ती एकून संख्या 43 हजार विद्याथ्यर्थ्यांची होती, त्याच्यात आता काहीच वाढ झालेली नाही. आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसं तुम्ही इंग्रजी शाळेतील विद्यार्थी फोडा", गुलाबराव पाटलांनी असं खळबळजनक वक्तव्य केलं होत. त्यामुळे त्यांनी केलेलं हे वक्तव्य फार चर्चेत आलेलं आहे.
त्यानंतर आता अजित पवारांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यावर साताऱ्यात अजित पवारांनी गुलाबराव पाटलांचे या वक्तव्यावर उत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले की, "गुलाबराव पाटील माझे सहकारी आहेत. मंत्रीमंडळात आम्ही एकत्र काम करतो. त्याच्यामुळे मी त्यांच्याकडून माहिती घेईन की, नक्की तुम्ही काय बोललात. त्यांच्याकडून माहिती न घेता मी काही तरी उत्तर दिलं तर त्याच्यातून वेगळा अर्थ काढला जातो. नाही तर गुलाबराव आमच्या पाठीला अर्धा टीव्ही स्क्रिन दाखवायचे अर्धा अजित पवार दाखवायचे", असं मिश्किल उत्तर अजित पवारांनी दिलेलं आहे.