बीड: 17 ऑगस्टला शरद पवारांची बीडमध्ये सभा झाली होती. यानंतर आता अजित पवार गटाकडून उत्तरसभा आयोजित केली आहे. या सभेच्या टिझरमध्ये शरद पवारांचे फोटो न वापरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात येण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळेच अजित पवार गटाने बीडच्या टिझरमध्येही शरद पवारांचा फोटो वापरलेला नाही. तर दुसरीकडे सामनाच्या पुणे आवृत्तीच्या जाहिरातीत शरद पवारांचा फोटो वापरण्यात आला आहे. या विरोधाभासाचे नेमके कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवारांच्या गटाची जाहिरात सामनामध्ये आल्याने संजय राऊतांवर देखील सवाल उपस्थितीत होत आहेत.