यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात अक्षता कलश पूजनावरून वाद झाला आहे. अक्षता कलश पूजनातून कुलगुरूंनी काढता पाय घेतले आहे. धार्मिक कार्यक्रमाला परवानगी दिल्यामुळे वंचित आक्रमक झाले आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून अक्षता कलश पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नियमावलीचे उल्लंघन करून प्रशासनाच्या आवारात अयोध्येतून आलेल्या श्रीमंगल अक्षता कलश पूजनाला परवानगी दिल्यामुळे हा वाद उद्भवला होता.