(2006 Mumbai Local Bomb Blast) मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सगळ्या दोषींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. पाच जणांचा फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. 19 वर्षानंतर आता त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
जानेवारी महिन्यात सुनावणी पूर्ण झाली असून कोर्टाने हा निर्णय राखून ठेवला होता. येरवडा, नाशिक, अमरावती आणि नागपूर कारागृहातून दोषींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीला हजेरी लावल्याची माहिती मिळत आहे. जे काही पुरावे या प्रकरणात होते त्यात तथ्यता नव्हती, त्यामुळे निर्दोष सुटका करण्यात आली असा उच्च न्यायालयाच म्हणणं असल्याची माहिती मिळत आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या विशेष खंडपीठाने हा निर्णय दिला.