थोडक्यात
अॅमेझॉन कंपनी 30 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा
अॅमेझॉन कंपनी पुन्हा लेऑफ करणार
अॅमेझॉन कंपनीचा मोठा निर्णय
(Amazon) अॅमेझॉन कंपनीने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉन कंपनी पुन्हा लेऑफ करणार असल्याची माहिती मिळत आहे. अॅमेझॉन कंपनी 30 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आणणार असल्याची माहिती मिळत असून दोन वर्षांत डिव्हाइसेस, कम्युनिकेशन्स, पॉडकास्टिंग आणि इतर विभागांसह विविध विभागांमध्ये कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे.
ही कामावरून काढून टाकण्याची प्रक्रिया अमेझॉनमधील सर्वात मोठी असेल असे म्हटलं जात आहे. या नवीन कपातीमुळे अनेक विभागांवर परिणाम होऊ शकतो. कंपनीने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कपात लागू केली आहे. Amazon ने 30,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याची घोषणा कंपनीने केली केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला असून ही प्रक्रिया मंगळवारपासून सुरु करण्यात आली आहे. अमेझॉन कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी वरून काढण्याची माहिती मिळताच खळबळ उडाली आहे.