आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार असो वा विरोधक, हे युती म्हणून लढणार की स्वबळावर लढणार अशा चर्चा सुरू आहेत. या चर्चा सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अमित शाह तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी राज्यातील पालिका निवडणुकीचा आढावा घेतला. त्यावेळेस मुंबई, ठाणे, पुणे शहरात स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाह काल मुंबईत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शाहांची भेट घेतली, या भेटीत शिंदेंनी मुंबईतील जवळपास 107 जागांची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.