शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाहांवर घणाघाती टीका केली आहे. अमित शाहांनी महाराष्ट्रात दळभद्री राजकारण केलं आहे. महाराष्ट्राला कमजोर करून उद्योग गुजरातला नेले. तर गृहमंत्र्यांचा कायदा सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. राज्यातील जनता अमित शाहांना शत्रू मानते असं महत्त्वाचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे. तर एक दिवस लालबागचा राजा ही गुजरातला नेतील असा टोला संजय राऊत यांनी अमित शाहा यांच्यावर लगावला आहे.
यावर संजय राऊत म्हणाले की, अमित शाहा यांच्यावरून महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. आज ते गृहमंत्री आहेत ते कमजोर गृहमंत्री आहेत. या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था पुर्णपणे धासळलेली आहे. जम्मु कश्मिर असेल, मणिपुर असेल इतर भाग असतील या गृहमंत्र्यांचं देशाताल्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे अजिबात लक्ष नाही. राजकारण, पक्षफोडी लुटमार मुंबई लुटन आणि लुटणाऱ्यांना पाठिंबा देणं, शिवसेना राष्ट्रवादी पक्षासारखे स्वाभिमानी पक्ष फोडून महाराष्ट्र अधिक कमजोर करतात अशाप्रकारची काम त्यांनी केली.
लालबागच्या राज्याच्या दर्शनात येत आहेत येऊ द्या मला तर सारखी भिती वाटते ज्याप्रकारे मुंबईतले अनेक उद्योग त्यालोकांनी गुजरातमध्ये पळवले अनेक संस्था पळवल्या गुजरातमध्ये त्याप्रमाणे हे लोक एक दिवस लालबागचा राजा पण पळवून न्हेनार नाही ना, हे लोक काही ही करू शकतात. असं संजय राऊत अमित शाहा यांच्यावर टीका करतं म्हणाले.