व्हिडिओ

Sanjay Raut on Amit Shah : अमित शाहांचं वक्तव्य हास्यास्पद, संजय राऊतांची टीका

Published by : Dhanshree Shintre

चार पक्षाच्या सभा, दौरे हे एकत्र होणारच आहे. पण या सध्याच्या डिजिटल युगामध्ये चिन्ह पोहोचायला फार वेळ लागत नाही. माननीय शरद पवारांच्या पक्षाला तुतारी चिन्ह मिळालं. तुतारी महाराष्ट्रात पोहोचली आम्हाला मशाल चिन्ह मिळालं मशाली पेटलेल्या आहेत गावा-गावांत, घरा-घरांमध्ये आणि मना-मनांमध्ये. आता प्रश्न आहे ज्यांना धनुष्यबाण मिळालं आणि ज्यांना घड्याळ मिळालं ते घड्याळ चालू आहे का त्यांना तपासून परत पाहावं लागेल आणि धनुष्यबाणाचा प्रत्यारोप जो असतो तो जागेवर आहे का ते त्यांना पाहावं लागेल आमची मशाल आणि तुतारी ही लोकांच्या मनात पोहोचली आहे असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, अमित शाह वारंवार परिवार वादावर बोलतात. या देशातील काही घरांना प्रतिष्ठा आहे ते पण ठाकरे घराण्याला. या देशातील काही घरांना प्रतिष्ठा आहे ते शरद पवारांच्या घराण्याला. कारण या दोन्ही घराण्यांनी देशाला, समाजाला, महाराष्ट्राला खूप काही दिलं आहे आणि या घराण्यांचे लाभार्थी हे नरेंद्र मोदी आणि अमित शाहसुद्धा आहेत हे त्यांनी आपल्या मनाला विचारायचं. बाळासाहेब घराण्यांचा वारसा हिंदूत्वाचा आहे त्याचाही लाभ भारतीय जनता पक्षाने वारंवार घेतलेला आहे. बाळासाहेब ठाकरे नसते महाराष्ट्रात तर भारतीय जनता पक्ष या राज्यामध्ये औषधालय दिसलं नसतं बाळासाहेबांचं बोट धरुन त्यांचं घराणेशाहीचं बोट धरुन इथे पक्ष वाढला.

भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीनं केली निवृत्तीची घोषणा; BCCI ने शेअर केली 'ही' खास पोस्ट

Rubik's Cube: तुम्हाला रुबिक्स क्यूब खेळायची सवय आहे का? तर मग हे वाचाच...

IPL 2024 : हैदराबादच्या पराभवानं 'या' संघांना होणार फायदा, CSK आणि RR चं नवीन कनेक्शन आलं समोर, जाणून घ्या पूर्ण समीकरण

संकल्प पत्राचं अनावरण करताना श्रीकांत शिंदे म्हणाले; "खुद्द PM नरेंद्र मोदींनी मला पत्र पाठवलं आणि..."

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत झालेल्या गोंधळावर भारती पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...