व्हिडिओ

Amol Mitkari on Ajit Pawar: अजित पवार किंगमेकर, दादाच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील

येणाऱ्या 25 नोव्हेंबरला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असं विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलाय.

Published by : Team Lokshahi

येणाऱ्या 25 नोव्हेंबरला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असं विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलाय. सत्ता स्थापनेत अजित पवार हे किंग मेकर असल्याचं ही ते म्हणाले. कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून निसटत सरकार महायुतीतच येणार असं भाकित त्यांनी केलं आहे.

अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील - अमोल मिटकरी

अमोल मिटकरी म्हणाले की, अजित दादा किंगमेकर आहेत अजित दादांनी 55 जागा ज्या उभ्या केल्या आहेत सर्व्हे रिपोर्ट आतापर्यंतचा पाहिला तर अजित दादांच्या 10 ते 12 जागा दाखवत आहेत, पण मी फिरलो 7 दिवस महाराष्ट्रात. त्यादरम्यान भुजबळ साहेब पराभवाच्या वाटेवर, वळसेपाटिल पराभवाच्या वाटेवर काय काय दाखवत आहेत. आमच्या वरिष्ठांकडून आणि आमच्याकडून असा अंदाज आहे की 30 ते 40 जागा आमच्या असतील आणि जर 35 जागा आमच्या असल्या तर महाराष्ट्रात अजित दादा किंगमेकर असतील.

येणाऱ्या 25 नोव्हेंबरला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील... असं विश्वास माझा आणि पुर्ण राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला आहे. सत्ता स्थापन करण्याच्या दिवशी मी अजित दादा पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की... हे शब्द ऐकायला माझे कान 9 वर्षापासून आतूरलेले आहेत आणि यावेळेस ती इच्छा पुर्ण होईल. याचे श्रेय राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आणि अजित दादांच्या लिडरशीपचं असेल, असं अमोल मिटकरी म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा