व्हिडिओ

Amravati Protest | अमरावतीत भाजप आक्रमक; राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन

अमरावतीमध्ये राहुल गांधींच्या विरोधात भाजप आक्रमक झालं आहे, तर आरक्षणाच्या बाबत वक्तव्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Published by : Team Lokshahi

अमरावतीमध्ये राहुल गांधींच्या विरोधात भाजप आक्रमक झालं आहे, तर आरक्षणाच्या बाबत वक्तव्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलेलं आहे, तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे.

यावर भाजप कार्यकर्ता म्हणाले, मागासवर्गीयांसाठी दिलेलं आरक्षण ते कसं घालवणार याबद्दलच जे बेताल वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व आघाड्या मोर्चांचे पदाधिकारी याठिकाणी निषेध करण्यासाठी आलेले आहेत. इंदिराजी गांधींनी घटनेची पायमल्ली कशी केली राजीवजीचं सुद्धा वक्तव्य राज्यघटनेसंबीतील आरक्षणासोबत होतं.

काल राहुलजीने तर ते डायरेक्टच बोललं की आम्ही आरक्षण घालवणार. आरक्षण येथील एससी एसटी आणि ओबीसी समाजच्या उत्थानाचं एक फार मोठं साधन आहे. हे आरक्षण कोणी घालू देणार नाही आणि त्याचा निषेध करण्यासाठी आणि हा इशारा देण्यासाठी याठिकाणी आम्ही आलेलो आहोत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uttarakhand landslide : उत्तराखंडमध्ये भूस्खलनात दोघांचा मृत्यू; सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Maharashtra Police : सण उत्सवासाठी राज्यात 'एक मंडळ, एक पोलीस अंमलदार' योजना

Latest Marathi News Update live : सण उत्सवासाठी राज्यात 'एक मंडळ एक पोलीस अंमलदार'

Latest Marathi News Update live : मराठा आरक्षणासंदर्भात मोठा बातमी, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली