अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आणि शहरात देखील मोठ्या प्रमाणात त्रिशूलच्या नावावर शस्त्रांचं वाटप होत आहे. त्रिशूलच्या नावावर जिल्ह्यात ग्रामीण भागात आणि शहरात गुप्त्यांचा वाटप होत आहे. असा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
या शस्त्रांचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल देखील यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. यशोमती ठाकूर यांनी या त्रिशूलांचे शस्त्र फोटो पत्रकार परिषदेत दाखवले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना या गोष्टी कशा घडतात? असा देखील प्रश्न यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला.
या सर्व शस्त्र वाटपाची माहिती आपण अमरावतीचे पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्त यांना व्हाट्सअप वरून दिल्याच देखील यशोमती ठाकूर यांनी सांगितल आहे. तसेच उद्या यामधून जर गुन्हेगारी घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न करत हे थांबवण्याचं आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले आहे.