व्हिडिओ

Anil Desai: अर्ज भरण्यापूर्वी अनिल देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले...

अर्ज भरण्यापूर्वी अनिल देसाई सिद्धिविनायक चरणी नतमस्तक

Published by : Sakshi Patil

आज अनिल देसाई उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यााधी त्यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी बोलताना अनिल देसाई म्हणाले की, आपल्या धार्मिक रीतीनुसार कोणतंही शुभकार्य करण्यापूर्वी सिद्धिविनायकाचे दर्शन आपण घेतो त्याचप्रमाणे इथे आलो आणि नतमस्तक झालो. सिद्धिविनायकचे आशीर्वाद घेतले, आता आपण काम करण्यासाठी आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्व मुभा बाप्पाने दिली आहे, असं अनिल देसाई म्हणाले.

तसेच वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्यमधून महाविकास आघाडीचे तिकीट जाहीर झालं आहे. आणि त्या धारावीच्या आमदार आहेत. त्यांचे काम आहे त्यामुळे त्यांना सहकार्य मिळणारच आहे. असं देखील ते म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, लोकसभेची निवडणूक किंवा कोणतीही निवडणूक झाली तर आपल्या या लोकशाहीमध्ये खरा अधिकार हा मतदारांचा आहे. मतदारांचे कौल घेण्यासाठी त्यांच्या दारात जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा