व्हिडिओ

Anil Deshmukh Car Attack: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम

माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आपली सभा आटपून येत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे.

Published by : Team Lokshahi

माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आपली सभा आटपून येत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे. यादरम्यान त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झालेली पाहायला मिळत आहे. यामध्ये त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव वाहत असताना दिसून येत आहे. काटोल येथून येत असताना त्यांच्यावर ही दगडफेक करण्यात आलेली आहे.

अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमदेवार सलील देशमुख यांच्या प्रचारासाठी नरखेड येथे गेले होते. ही दगडफेक होत असताना अनिल देशमुख त्यांच्या कारमध्ये बसले आणि त्यांच्या कारमागे असलेले कार्यकर्ते कारमधून बाहेर आले. त्यांना बघताच दगडफेक करणारे शेतातून पळून गेले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा वाद मिटला; मानाच्या गणपतीची सकाळी 8 वाजता मिरवणुक होणार सुरू

Nagpur Marbat : मारबत मिरवणुकीसाठी नागपूर पोलिसांचा कडक बंदोबस्त; ड्रोन कॅमेऱ्यातून नजर

Monorail : मोनोरेल पुन्हा झाली ओव्हरलोड; 50 प्रवाशांना उतरवलं खाली

Pigeon Feeding : नियंत्रित पद्धतीने कबुतरांना खाद्य देण्यासाठी तीन संस्थांनाचे अर्ज